These 5 tips to reduce stress in few minutes

तणाव वाढल्यास लोक मद्य, ड्रग्ज, धुम्रपान सेवन सुरू करतात. त्यामुळे तात्पुरते बरे वाटत असले तरी तणाव कायमस्वरूपी दूर होत नाही. शिवाय यामुळे आरोग्याच्या इतर समस्या सुरू होतात. त्यामुळे तणाव दूर करण्यासाठी जीवनपद्धती बदलण्याची गरज आहे.
When stress increases, people start consuming alcohol, drugs, smoking. So, although it feels better temporarily, the tension does not go away permanently. It also causes other health problems. Therefore, there is a need to change the way of life to eliminate stress.
धावपळीच्या युगात तणाव ही एक गंभीर समस्या झाली आहे. या समस्येवर आपण मात करु शकतो. काही मिनिटात तणाव कमी करण्यासाठी काही सोप्या टीप्स आहेत.
Stress has become a serious problem in the age of rush. We can overcome this problem. Here are some simple tips to reduce stress in a minute.
तणावामुळे होतात या समस्या
These problems are caused by stress
आपल्या सर्वांचे आयुष्य धकाधकीचे झाल्यामुळे तणाव अपरिहार्य आहे. तणाव दीर्घकाळ राहिल्यास चिंतेचे रूप धारण करतो. मानसिक एकाग्रता कमी होते, डोकेदुखी सुरू होते, अभ्यासात अडचणी येतात, थकवा वाटू लागतो, मन व शरीरावर तणावाचे अनेक परिणाम सुरू होतात. अनेकदा मानसिक संतुलनही बिघडते. चिडचिडेपणा येतो. संताप वाढतो. आरोग्य बिघडते. याशिवाय मानसिक आजारही घेरतात. झोप न येणे, डोकेदुखी, मायग्रेन, नैराश्य, उच्च रक्तदाब, ह्रदयासंबंधी तक्रारी, लठ्ठपणा, अॅसिडीटी, अल्सर, केस झडणे आदी व्याधी मागे लागायला सुरु होतात.
अस्वस्थता, डोकेदुखी, अपस्मार, नाडीची गती वाढणं, छातीत दुखणं, हृदयविकार, श्वासाला अडथळा आल्यासारखं वाटणं किंवा श्वास जोरात चालणं, उच्च रक्तदाब, जिभेला कोरड पडणं, अपचन, अॅसिडिटी, मूत्राशयावरील नियंत्रण कमी होणं, कोलेस्टोरॉलचं प्रमाण वाढणे, पाठदुखी, पोटदुखी, उलटी होण्याची भावना, कंबरदुखी, हातापायांना गोळे येणं, रोग प्रतिकारकशक्ती कमी होणे आदी समस्या उद्धभतात.
Stress is inevitable as all of our lives are stressful. Stress takes the form of anxiety if prolonged. Mental concentration decreases, headaches start, difficulties in studies occur, fatigue begins, many effects of stress on the mind and body begin. Often mental balance is also disturbed. Irritability occurs. Anger grows. Health deteriorates. Apart from this, mental illness also surrounds. Insomnia, headache, migraine, depression, high blood pressure, cardiac complaints, obesity, acidity, ulcers, hair loss etc. diseases start to recede.
Restlessness, headache, epilepsy, increased pulse rate, chest pain, heart disease, shortness of breath or shortness of breath, high blood pressure, dry tongue, indigestion, acidity, decreased bladder control, increased cholesterol, back pain, stomach pain, vomiting Problems such as emotions, back pain, numbness in limbs, decreased immunity etc. arise.
हे आहेत 5 उपाय
Here are 5 solutions
1. दीर्घ श्वास घ्या.
1. Take a deep breath.
तुम्ही आपल्या श्वासवर लक्ष केंद्रीत करा. तुमचे वाढलेले हृदयाचे ठोके कमी करण्यास दीर्घ श्वास मदत करतो. जसे कि शरिरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते व मेंदूला ऑक्सिजन पुरवठा वाढतो. त्यामुळे मनाला शांतता वाढते. आपल्या शरीरातील स्नायूंवरील ताण कमी होण्यास मदत होते. नेहमी दीर्घ श्वास आत घेण्याची अंगी लावून घ्या. त्यामुळे ताण तणाव कमी होण्यास मदत होते.
You focus on your breathing. Deep breathing helps to slow down your elevated heart rate. As the amount of oxygen in the body increases and the oxygen supply to the brain increases. It increases peace of mind. It helps in reducing the stress on the muscles in your body. Always wear a long inhaler. It helps in reducing stress.
2. मित्रांसह गप्पा/व्यक्त करा.
2. Chat/express with friends.

मित्र-मैत्रीणींशी आणि आवडत्या व्यक्तींशी मनसोक्त गप्पा मारा. त्यामुळे मनावरील ताण कमी होतो.
Chat heartily with friends and loved ones. It reduces stress on the mind.
३.योगासने आणि हलका व्यायाम करा.
3. Do yoga and light exercise.
कोणताही विचार न करता १५ ते २० मिनिटे डोळे बंद करून बसा व नियमित व्यायाम करा जेणेकरून फ्रेश वाटते.
Sit with eyes closed for 15 to 20 minutes without thinking and do regular exercise to feel fresh.
४. छंदासाठी थोडा वेळ काढा.
4. Take some time for hobbies.
टीव्ही बघून किंवा संगीत ऐकून स्वतःची करमणूक करा. त्यामुळे मनाला थोडी विश्रांती मिळते. लक्ष त्याकडे केंद्रीत होते. त्यामुळे तणाव हलका होण्यास मदत होते.
Entertain yourself by watching TV or listening to music. So the mind gets some rest. Attention was focused on it. It helps to relieve stress.
५. धावा किंवा जोरात चाला.
5. Run or walk briskly.
तुम्हाला शारीरिक व्यायामाची गरज आहे. नियमित व्यायाम केल्याने शरीरावरील ताण कमी होतो. व्यायाम केल्याने आपल्या शरीराला ताजा ऑक्सिजन मिळतो. तुमचा मूड चांगला राहतो. त्यामुळे व्यायामावर भर द्या.
You need physical exercise. Regular exercise reduces stress on the body. Exercising gives your body fresh oxygen. You are in a good mood. So focus on exercise.