प्रस्तावना: त्वचा हा आपल्या शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे आणि चेहर्याची त्वचा हा प्रत्येकाच्या सौंदर्याचा एक महत्वाचा भाग असतो. जो की एखाद्या व्यक्तीचे सौंदर्य दर्शविते. चेहर्याची कांती नितळ, सतेज आणि तुकतुकीत असावी असे प्रत्येकालाच वाटते. त्यामुळे चेहर्यावर पडलेले काळे डाग कोणालाच नको असतातआणि ते खूप लाजिरवाणे वाटतात . जरी ह्या डागांचा दुखणे किंवा जळजळणे असा कोणताही त्रास होत नसला तरी ते चेहर्याच्या सौंदर्यात मोठी बाधा आणतात आणि म्हणूनच ज्यांच्या चेहर्यावर असे काळे डाग असतात ते लोक त्यावरचे घरगुती उपाय अथवा औषधोपचार शोधतात. ह्या या लेखात आपण पाहणार आहोत चेहर्यावर काळे डाग कसे चमत्कारी घरगुती उपायांच्या मदतीने नष्ट करायचे.
Introduction: Skin is the largest organ in our body and facial skin is an important part of everyone’s beauty. Which shows the beauty of a person. Everyone wants the face to be smooth, bright and radiant. So no one wants dark spots on the face and they feel very embarrassing. Although these spots do not cause any pain or irritation, they cause a major disturbance in the beauty of the face and hence people who have such dark spots on their face look for home remedies or medicines. In this article, we will see how to get rid of dark spots on the face with the help of miraculous home The remedies.
चेहर्यावर काळे डाग येण्याची काही कारणे/ CAUSES OF BLACK SOPTS/ PIGMENTATION ON FACE
जेंव्हा आपली त्वचा प्रमाणापेक्षा आधिक मेलानिन (melanin) तयार करते, तेंव्हा हायपरपिगमेंटेशन म्हणजे त्वचेच्या रंगामधे गडदपणा येऊन बदल दिसू लागतो आणि ह्यामुळे त्वचेवर काळे डाग पडतात. तीव्र उन्हामुळे अथवा वाढत्या वयामुळे देखील चेहर्याच्या त्वचेवर काळे डाग पडू शकतात. शरीरातील व्हीटामिन बी १२ च्या कमतरतेमुळेही हायपरपिगमेंटेशन होते, ज्यामुळे त्वचेवर काळे किंवा गडद रंगाचे डाग दिसू लागतात. हायपरपिगमेंटेशन चे अजून एक प्रमुख कारण म्हणजे हार्मोन्स चे असंतुलन. काही औषधांच्या दुष्परिणामांमुळे चेहर्यावर तसेच शरीराच्या इतरही भागांवर काळे डाग पडतात.
When our skin produces more melanin than normal, hyperpigmentation is a darkening of the skin color and causes dark spots on the skin. Dark spots can occur on the skin of the face due to intense sun or aging. Deficiency of vitamin B12 in the body also causes hyperpigmentation, which causes black or dark spots on the skin. Another major cause of hyperpigmentation is hormonal imbalance. The side effects of some medicines can cause dark spots on the face as well as other parts of the body.
बर्याचदा, त्वचेवरील काळे डाग हे कोणत्याही उपचारांशीवाय निघून जातात परंतू अशा डागांचे नेमके कारण समजून घेणे आपल्यासाठी आवश्यक आहे. त्वचेच्या कोणत्या आजारमुळे हे डाग पडत असतील तर त्या आजाराचे योग्य निदान होऊन त्यावरचे उपचार (Right diagnosis and treatment) घेणे महत्वाचे ठरते. तसेच, एखाद्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे (Vitamin-E) अथवा हार्मोन्सच्या असंतुलनामुळे पडलेले डाग घालवण्यासाठी ती कमतरता भरून काढण्याच्या दृष्टीने आहार किंवा औषधे घेणे गरजेचे ठरते. त्यामुळे तज्ञाच्या मार्गदर्शनाशिवाय कोणतेही उपचार करणे योग्य नाही. तरीही, चेहर्यावरील काळे डाग घालवण्यासाठीचे तुलनेने सुरक्षित असे काही घरगुती उपाय पुढीलप्रमाणे. तुम्ही जर चेहर्यावरील काळ्या डागांमुळे त्रस्त असाल तर हे पुढील 5 घरगुती उपाय नक्की करून बघा.
Often, dark spots on the skin go away without any treatment but it is important for us to understand the exact cause of such spots. If these spots are caused due to any skin disease, it is important to get the right diagnosis and treatment of that disease. Also, it is necessary to take diet or medicines to remove the spots due to deficiency of a vitamin (Vitamin-E) or imbalance of hormones. Therefore, it is not advisable to do any treatment without the guidance of a specialist. However, following are some relatively safe home remedies to get rid of dark spots on face. If you are suffering from dark spots on your face, make sure to try these 5 home remedies.
चेहर्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी हे पाच चमत्कारी घरगुती उपाय/Five miraculous home remedies to remove dark spots from the face
1. लिंबाचा रस आणि दही/Lemon juice and curd

लिंबाचा रस आणि दही यांचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात. लिंबाचा रस ब्लीचिंग एजंट म्हणून काम करतो ज्यामुळे त्वचेवरील काळे डाग कमी होतात. दह्यामुळे त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते.
Applying a mixture of lemon juice and curd on the face reduces dark spots on the face. Lemon juice acts as a bleaching agent which reduces the dark spots on the skin. Yogurt helps in cleansing the skin.
2. मधाचा लेप/Honey coating

चेहऱ्यावर शुद्ध मधाचा लेप लावल्यासाही त्वचेला तेज येतो तसेच त्वचेवरील काळ्या किंवा गडद रंगाचे डाग निघून जाण्यास मदत होते.
Applying pure honey on the face also brightens the skin and helps to get rid of black or dark spots on the skin.
3. हळदीचा लेप/Turmeric paste coating

हायपरपिगमेंटेशन रोकण्यासाठी हळद अतिशय गुणकारी ठरते. चेहर्यावर हळदीचा लेप लावल्याने त्वचा उजळते तसेच तिच्यावरील काळे डाग कमी होतात.
Turmeric is very effective in preventing hyperpigmentation. Applying turmeric on the face brightens the skin and reduces dark spots.
4. एलोवेरा जेल/Aloe Vera Gel

चेहर्याला आलो वेरा एलोवेरा लावल्यास त्वचेवरील काळे डाग कमी होतात तसेच आलो वेरा एलोवेरामुळे त्वचा मुलायम आणि टवटवीत राहण्यासही मदत होते.
Applying Alo Vera Aloe Vera on the face reduces dark spots on the skin and Alo Vera Aloe Vera also helps in keeping the skin soft and rejuvenated.
5. पपई/Papaya

पपई मधील काही घटकांमुळे जसे कि जीवनसत्व-अ त्वचेचा काळेपणा कमी होतो. पपईचा गर चेहर्यावर नियमितपणे लावल्यास, चेहर्याची त्वचा उजळते.
Some of the ingredients in papaya like Vitamin-A reduce skin darkening. Regular application of papaya gar on the face will lighten the skin of the face.
चेहर्यावरील काळे डाग घालवण्यासाठी ह्या निसर्गोपचारांबरोबरच, योग्य तो आहार घेणे, आणि नियमित व्यायाम करणे, तसेच, त्वचेची काळजी घेणे (skin care)आणि तीव्र उन्हापासून त्वचेला सुरक्षित ठेवणे खूप महत्वाचे आहे.
Along with these natural remedies to get rid of dark spots on the face, it is very important to have a proper diet and exercise regularly, and also to take care of the skin and protect the skin from the sun.