
Control Blood Sugar in 10-15 Days:
Diabetes, sugar or diabetes is a rapidly spreading and serious disease. Unfortunately, there is no permanent cure for diabetes. But if you keep it under control, you can lead a normal life. Doctors and experts advise diabetic patients to follow a healthy diet and moderate exercise as these two methods are most effective in controlling diabetes. Diabetes causes the blood sugar level of the patient to increase which needs to be controlled. Its increase can cause many serious problems like excessive thirst, excessive urination, blurred vision, weight loss.
There are many medications available to control diabetes, but you can get it under control by using a few simple methods. What are the Ayurvedic treatments for diabetes? Many Ayurvedic expert doctors assure that avoiding these 5 things can help you reduce blood sugar level in 10-15 days.
- Avoid a sedentary lifestyle

Diabetics are required to do 40 minutes of physical activity (walking, cycling, cardio and yoga) and 20 minutes of deep breathing (pranayama) every day. Being active is essential if you want to prevent or manage diabetes. Therefore, keeping the blood circulation smooth, every cell in the body gets enough oxygen, detoxifies the liver and helps in the proper secretion of insulin.
- Stay away from these foods

Avoid wheat and wheat products such as sugar, flour (processed food), yogurt and gluten. Instead, eat more fruits and vegetables. Cow’s milk and ghee should also be consumed in small quantities. Sorghum, ragi, amaranth, millet should be eaten as much as possible.
- Eating dinner early

Eating an early dinner is one of the easiest and healthiest ways to lower your blood sugar levels and reduce your risk of cardiovascular disease. If possible, have dinner before sunset.
- Do not sleep immediately after eating

People with high blood sugar are strictly forbidden to sleep during the day. Daytime sleep increases kapha dosha in the body, which increases blood sugar levels. Even at night it is advised by experts to sleep 3 to 4 hours after dinner.
- Don’t rely only on diabetes pills

Not following a healthy routine and relying entirely on diabetes medications can damage your liver and kidneys at an early age.
Note: This article is for general information only. It is in no way a substitute for any medication or treatment. Always consult your doctor for more details.
मधुमेह, शुगर किंवा डायबिटीज हा झपाट्याने पसरणारा आणि गंभीर आजार आहे. दुर्दैवाने, मधुमेहावर कायमस्वरूपी कोणताही उपचार नाही. पण ते नियंत्रणात ठेवल्यास आपण सामान्य जीवन जगू शकता. डॉक्टर आणि तज्ञ मधुमेही रुग्णांना निरोगी आहार आणि मध्यम व्यायामाचे पालन करण्याचा सल्ला देतात कारण या दोन पद्धती मधुमेह नियंत्रित करण्यासाठी सर्वात प्रभावी आहेत. मधुमेहामुळे रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते ज्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. याच्या वाढीमुळे जास्त तहान लागणे, जास्त लघवी होणे, अंधुक दिसणे, वजन कमी होणे अशा अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.
मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक औषधे उपलब्ध आहेत, परंतु तुम्ही काही सोप्या पद्धती वापरून त्यावर नियंत्रण मिळवू शकता. मधुमेहावर कोणते आयुर्वेदिक उपचार आहेत? भरपूर आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टर खात्री देत आहेत की या 5 गोष्टी टाळल्याने तुम्हाला 10-15 दिवसांत रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होऊ शकते.
1. सुस्त जीवनशैलीपासून दूर राहा

मधुमेही रुग्णांनी दररोज ४० मिनिटे हालचाल (चालणे, सायकल चालवणे, कार्डिओ आणि योग) आणि २० मिनिटे दीर्घ श्वास घेणे (प्राणायाम) करणे अनिवार्य आहे. जर तुम्हाला मधुमेह रोखायचा असेल किंवा त्याचे व्यवस्थापन करायचे असेल तर अॅक्टिव्ह असणे आवश्यक आहे. त्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया (blood circulation) सुरळीत राहून शरीरातील प्रत्येक पेशीला पुरेसा ऑक्सिजन, लिव्हर डिटॉक्स होणं आणि इन्सुलिनचा योग्य स्राव होण्यास मदत होते.
2. खाण्याच्या या गोष्टींपासून दूर राहा

साखर, मैदा (प्रक्रिया केलेले अन्न), दही आणि ग्लूटेन यांसारख्या गहू आणि गव्हाच्या उत्पादनांपासून दूर रहावे. त्याऐवजी अधिकाधिक फळे आणि भाज्या खाव्यात. गाईचे दूध आणि तूपही कमी प्रमाणात खावे. ज्वारी, नाचणी, राजगिरा, बाजरी या गोष्टी जास्तीत जास्त खाव्यात.
3. रात्रीचे जेवण लवकर खाणे

रात्रीचे जेवण लवकर खाणे हा तुमची रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याचा आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा म्हणजेच कार्डियोवॅस्कुलर डिजीज धोका कमी करण्याचा सर्वात सोपा व हेल्दी मार्ग आहे. शक्य असल्यास, सूर्यास्तापूर्वीच रात्रीचे जेवण करून घ्या.
4. जेवल्यानंतर लगेच झोपू नका

हाय ब्लड शुगर असलेल्या लोकांना दिवसा झोपण्यास सक्त मनाई आहे. दिवसा झोपेमुळे शरीरातील कफ दोष वाढतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. रात्री देखील रात्रीच्या जेवणानंतर 3 ते 4 तासांनी झोपण्याचा सल्ला एक्सपर्ट्सकडून दिला जातो.
5. फक्त डायबिटीजच्या गोळ्यांवरच अवलंबून राहू नका

एक निरोगी दिनचर्या न पाळणे आणि मधुमेहावरील औषधांवर पूर्णपणे अवलंबून राहणे हे लहान वयातच तुमचे लिव्हर आणि किडनी खराब करू शकते.
टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.