तुमची लहान मुले हे एनर्जी ड्रिंक/शीतपेय पिऊन होत आहेत का झिंग Are your kids drinking energy drinks/soft drinks?

वाचा काय आहे आजची परिस्थिती/Read what is today’s situation

शहर असेल किंवा खेडेगाव असेल एनर्जी ड्रिंक म्हटलं की सहजरित्या उपलब्ध होणारे शीतपेय दुकानात हमखास उपलब्ध आहे. आजकाल लहान मुलांचे आकर्षण याकडे भरपूर प्रमाणात वाढतच चालले असून पालकांसाठी खूप चिंतेची बाब आहे. आज लहान मुले एनर्जी ड्रिंक ला खूप प्रमाणात पसंती दर्शवीत आहेत, एनर्जी ड्रिंक हे एक प्रकारचं आकर्षणच बनलं आहे. बाजारामध्ये एनर्जी ड्रिंक विक्रीचा वेग प्रमाणाच्या बाहेर आहे खर पाहायला गेलं तर यांचा काही प्रमाणात तुटवडा देखील भासत आहे कारण मागणीच इतकी जास्त होत चालली आहे.अशाप्रकारच्या एनर्जी ड्रिंक कडचे आकर्षण हे फक्त आणि फक्त कॅफिन नावाच्या पदार्थामुळे असून ते एनर्जी ड्रिंकमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. जो पिल्याने नशा येते म्हणायला हरकत नाही एकदा का बाजारात विकलं जाणार हे कॅफिन युक्त शीतपेयाची चटक लागली कि मग ती सुटणे खूप अवघड होतंय.

Whether it is a city or a village, energy drinks are easily available in the shops. These days the attraction of children is increasing in abundance and it is a matter of great concern for the parents. Today, children are showing a lot of preference for energy drinks, energy drinks have become a kind of attraction. The speed of sale of energy drinks in the market is out of proportion. In fact, there seems to be some shortage of them because the demand is increasing. The attraction of such energy drinks is only and only because of the substance called caffeine, which is available in abundance in energy drinks. It goes without saying that drinking one is intoxicating, once you get hooked on this caffeinated soft drink that is sold in the market, it becomes very difficult to get rid of it.

एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली या शीतपेयाने धुमाकूळ माजवला आहे लहान मुले, तरुण, प्रौढ, महिला आणि मुली यांच्यावर नशेची जणू जादूच केली आहे. शहरापासून ते खेड्यापर्यंत लोकांवर या एनर्जी ड्रिंक ची झिंग चढली आहे.

Under the name of energy drink, this soft drink has created a buzz and has worked its magic on children, youth, adults, women and girls. From the city to the village, this energy drink has caught the attention of people.

विशेष म्हणजे अगदी कमी पैशात ही ड्रिंक्स भेटत असल्याने शालेय विद्यार्थी याकडे आकर्षित होऊन खूप जास्त सेवन करत असल्याचे दिसून येते आहे.हे एनर्जी ड्रिंक सेवन केल्याने अंगात तात्पुरती तरतरी निर्माण होते.या एनर्जी ड्रिंकच्या बाटलीवर स्पष्ट लिहले आहे की यामध्ये कॅफिन असून एका 250 मिली बाटलीत दर 100 मिली मागे 29 मिग्रॅ कॅफिन आहे व पूर्ण बाटलीत 72 मिग्रॅ कॅफिन असून गरोदर महिला, स्तनदा माता व लहान मुले यांनी सेवन करू नये. सेवन केल्यास दुःष्परिणाम भोगावे लागतील.

Specially, since these drinks are available for very little money, it is seen that school students are attracted to them and consume a lot. Consuming this energy drink creates a temporary feeling in the body. It is clearly written on the bottle of this energy drink that it contains caffeine and a 250 ml bottle contains 100 ml contains 29 mg of caffeine and a full bottle contains 72 mg of caffeine and should not be consumed by pregnant women, nursing mothers and children. Consuming it will lead to side effects.

या एनर्जी ड्रिंकच्या बाटलीवर स्पष्ट लिहले आहे की दरदिवशी 500मिली पेक्षा जास्त सेवन करू नये. जर घेतले तर शरीरावर वाईट परिणाम होतील.परंतु लहान मुले सर्रास एका दिवसात 2-4 बाटल्या सहज संपवीत आहेत. व याकडे पालकांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.म्हणून शासन प्रशासनाने यावर बंदी घालणे अत्यावश्यक असल्याचे भासत आहे.

It is clearly written on the bottle of this energy drink that you should not consume more than 500ml per day. If consumed, it will have bad effects on the body. But children usually easily finish 2-4 bottles in a day. And this is completely neglected by the parents. So it seems that it is imperative for the government administration to ban this.

मुलांमध्ये कॅफिनच्या वापराबद्दल आपण काळजी का करावी?Why should we be worried about caffeine use in children?

लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये कॅफिनचा वापर अनेक कारणांमुळे चिंतेचा विषय आहे. प्रथम, या लोकसंख्येमध्ये कॅफिनच्या वापराचे शारीरिक आणि मानसिक परिणाम फार कमी अभ्यासांनी तपासले आहेत. जरी प्रौढ लोकसंख्येचा डेटा सूचित करतो की कॅफीन तुलनेने सुरक्षित आहे, परंतु मुलांचा विचार केवळ लहान प्रौढ म्हणून केला जाऊ नये. कॅफीनचा मुलांवर आणि किशोरवयीन मुलांवर परिणाम होऊ शकतो जो प्रौढांमध्ये दिसणाऱ्यांपेक्षा वेगळा असतो. दुसरे म्हणजे, बालपण आणि पौगंडावस्था हा वेगवान वाढीचा काळ आणि मेंदूच्या विकासाचा अंतिम टप्पा आहे. वाढ आणि विकास वाढवण्यासाठी, योग्य झोप आणि पोषण आवश्यक आहे. कॅफिनचा वापर झोपेच्या पद्धतींमध्ये व्यत्यय आणतो

The use of caffeine among children and adolescents is of concern for a number of reasons. First, very few studies have examined the physiological and psychological effects of caffeine use in this population. Although data from adult populations suggest that caffeine is relatively safe, children should not be thought of merely as small adults. Caffeine could have effects on children and adolescents that are different from those seen in adults. Second, childhood and adolescence is a period of rapid growth and the final stage of brain development. In order to maximize growth and development, proper sleep and nutrition are essential. Caffeine use disrupts sleep patterns

निष्कर्ष/Conclusion:

आज लहान मुले एनर्जी ड्रिंक ला खूप प्रमाणात पसंती दर्शवीत आहेत, एनर्जी ड्रिंक हे एक प्रकारचं आकर्षणच बनलं आहे. बाजारामध्ये एनर्जी ड्रिंक विक्रीचा वेग आवाक्याबाहेर आहे खर पाहायला गेलं तर यांचा काही प्रमाणात तुटवडा देखील भासत आहे कारण मागणीच इतकी जास्त होत चालली आहे.अशाप्रकारच्या एनर्जी ड्रिंक कडचे आकर्षण हे फक्त आणि फक्त कॅफिन नावाच्या पदार्थामुळे असून ते एनर्जी ड्रिंकमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. जो पिल्याने नशा येते म्हणायला हरकत नाही. आणि पालकांनी याकडे पूर्ण लक्ष देणे गरजेचे आहे.आज शासन प्रशासनाने यावर बंदी घालणे अत्यावश्यक असल्याचे भासत आहे.

Today, children are showing a lot of preference for energy drinks, energy drinks have become a kind of attraction. The speed of selling energy drinks in the market is out of reach. In fact, there seems to be some shortage of them because the demand is increasing. The attraction of such energy drinks is only and only because of the substance called caffeine, which is available in abundance in energy drinks. There is no problem in saying that drinking it makes you intoxicated. And it is necessary for the parents to pay full attention to this. Today, it seems that it is essential for the government administration to ban this.

Leave a Reply